Monday 15 September 2014

“तज्ञ”: कसे असावेत/नसावेत


“तज्ञ”: कसे असावेत/नसावेत
“पीएमसी तज्ञ” कसे असावेत व कसे नसावेत हे देखील पाहुया....
                पीएमसी निवड करतांना पुष्कळवेळा सभासद, समिती सदस्य प्राथमिक चुका करतात आणि मग फार पस्तावतात. निवड करतांना त्या पीएमसी कंपनीचा व त्यांच्या सर्व असोसिएट्सचा सर्वांगीण वैशिष्ट्यांचा विचार केला पाहिजे.
                त्या पीएमसी कंपनीच्या पॅनेलवरील आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनियर्स हे तज्ञ शासकीय व स्थानिक प्राधिकरणाकडे नोंदीत असायला हवेत. त्या सर्वांना व त्यांच्या सर्व स्टाफला बांधकामाबाबत योग्य ज्ञान व अनुभव असायला हवा. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष साईटवरील कामाचा अनुभव व ज्ञान त्यांच्याकडील संबंधित तज्ञाला असायलाच हवे.
                त्या पीएमसी कंपनीचा मुख्य को-ऑर्डीनेटर कोण आहे? त्याला योग्य अनुभव व ज्ञान आहे का? विकासकाच्या अवाढव्य यंत्रणेवर ते सर्व तज्ञ व्यवस्थित अंकुश ठेवू शकतील का? प्रकल्पामधून बऱ्यापैकी नफा व पैसे कमवणारा विकासक चालढकल करत असेल, कामाच्या दर्जाबाबत विशेष जागरूक नसेल तर त्या विकासकाला वेळप्रसंगी धारेवर धरून त्याच्याकडून यशस्वीरीत्या काम पूर्ण करून घेवू शकतील का? साईटवर देखरेख करणारा तज्ञ कामगारांना प्रशिक्षण देवून त्यांच्याकडून उत्कृष्ट दर्जाचे काम करून घेवू शकतो का? या सर्व गोष्टींना महत्व दिलं पाहिजे. हे सर्व न पाहता नको त्या गोष्टींना महत्व दिले जाते. अनेकवेळा पीएमसी फी किती कमी घेतात हेच पाहिले जाते.
 लक्षात ठेवा....  “फी अव्यवहार्य तर नुकसान मोठे.”
              
               असेही घडले आहे की एका ठिकाणी पीएमसीला नियुक्त करतांना त्या पीएमसीचे महागडे ऑफिस, गाडी या सर्व बाबी सोसायटीच्या समितीकडून पाहिल्या गेल्या. या सर्वाचा पुनर्विकास प्रकल्पाशी नक्की संबंध काय?
               एका सोसायटीतला अनुभव सांगण्यासारखा आहे. इतर चार पीएमसींबरोबर मला देखील सोसायटीच्या समितीने पीएमसी निवडीसाठी बोलावले होते. सर्वांसमक्ष तिथे असा संवाद झाला....सेक्रेटरी: [मला उद्देशून] “तुम्हाला बोलावणार नव्हतो पण निवड करण्यासाठी पाच पीएमसी असावेत असे वाटले म्हणून या चौघांबरोबर तुम्हालाही बोलावले.” 
मी: “धन्यवाद! पण मला का बोलावणार नव्हता ते कळू शकेल का?
सेक्रेटरी: “त्याचं मुख्य कारण हे आहे की या चौघांजवळ Ixyz सर्टीफिकेट आहे. मात्र तुमच्या कंपनीकडे ते नाही आहे.”
मी: “पण तुमच्या प्रकल्पाचं काम तर मी करणार आहे. माझ्याकडील एखाद्या Ixyz सर्टीफिकेटचा कागद प्रकल्पाचं काम कसं करणार?                 
प्रकल्पाचे काम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जो अनुभव व ज्ञान लागतं ते माझ्या बुद्धी व व्यक्तीमत्वामध्ये आहे, सर्टिफिकेटच्या त्या कागदात नाही.
                माझं ज्ञान व अनुभव यावर आधारित माझं प्रेझेंटेशन माझ्या लॅपटॉपमध्ये तयार आहे. ते मी देतो व या सर्वांना त्यांचे प्रेझेंटेशन देवू द्या. ज्याचं प्रेझेंटेशन अपील होईल त्याचा तुम्ही विचार करा.”
                सेक्रेटरीने इतर चौघांना ते प्रेझेंटेशन देवू शकतात का हे विचारले असता सर्वांनी नकार दिला. इम्पोर्टेड कागदावरील छापील प्रोफाईल हेच त्यांचे प्रेझेंटेशन असल्याचे त्यांनी सांगितले. मग मी स्वत: लॅपटॉपवर माझे PPT प्रेझेंटेशन त्यांना दिले.
                त्यानंतर लॅपटॉप बंद न करता नेटद्वारे इमेल उघडला. काही अटींवर “तेरा ते सोळा हजार रुपयांमध्ये Ixyz सर्टीफिकेट तुमच्यापर्यंत पोहोचवू” असे आलेले अनेक इमेल्स सेक्रेटरीना दाखवले.
                तात्पर्य, निवड करतांना कशाला महत्व द्यायचे हे निवड करणाऱ्यालाच नीट माहीत नसेल तर कामामध्ये गोंधळ अपरिहार्य. विकत मिळणारे कागद बाळगणाऱ्यांना प्राधान्य द्यायचे कि प्रत्यक्ष ज्ञान व अनुभव असलेल्या तज्ञांना हे सर्व लोकांना कळेल तो सुदिन.
                एखाद्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर असलेली सभासद व्यक्ती अनेकदा पीएमसी वा विकासक यांची निवड आपल्या कसोट्या लावून करू पहाते. त्यांचा आदर ठेवून सांगू इच्छितो की, ते कार्य करत असलेले क्षेत्र आणि बांधकामक्षेत्र यात फार मोठी तफावत आहे. उदा. अमिताभ बच्चन मोठे अभिनेते आहेत, सचिन महान क्रिकेटपटू तर लतादीदी-आशाताई या दैवी आवाज असलेल्या गायिका पण त्यांना बांधकाम/RCC यामधील बारकावे व्यवस्थित माहिती असण्याची शक्यता कमी. तिथे बांधकाम क्षेत्रातील तज्ञच हवा.
                काही व्यक्ती सल्ला घ्यायला येतात. एका सोसायटीचे समिती सदस्य आले होते प्रकल्प सहा वर्षे रखडला आहे.
मी: “पीएमसी कोण आहेत? ते काय करताहेत?
सदस्य: ज्या उच्चशिक्षित पीएमसीला नियुक्त केले आहे ते साईटवर येत नाहीत पण विकासकाच्या ऑफिसमध्ये नेहेमी बसलेले असतात. योग्य करारपत्रे झालेली नाहीत. जागा ताब्यात घेवून इमारत पाडून पत्रे लावून झाल्यावर विकासक आता सभासदांना जुमानत नाही.

                हे सर्व ऐकून या अशा पीएमसीचे कौतुक करायचे कि अशा पीएमसीला नियुक्त करणाऱ्या सोसायटीचे व सभासदांचे कौतुक करायचे? स्वत:च्या निवाऱ्याबाबत एव्हढे निष्काळजी????

No comments:

Post a Comment